एसरचा स्मार्ट टॅब्लेट ‘आयकॉनिक डब्लू ३’

लॅपटॉप आणि कंम्प्युटरच्या दुनियेतील अग्रगण्य नाव म्हणजे ‘एसर’. लॅपटॉप आणि कंम्प्युटरनंतर एसरने ग्राहकांसाठी एक नवीन उत्पादन बाजारात आणलेय. एसरचा नवा ‘आयकॉनिक डब्लू ३’ हा स्मार्ट टॅब्लेट आलाय.

Updated: Jun 27, 2013, 04:04 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लॅपटॉप आणि कंम्प्युटरच्या दुनियेतील अग्रगण्य नाव म्हणजे ‘एसर’. लॅपटॉप आणि कंम्प्युटरनंतर एसरने ग्राहकांसाठी एक नवीन उत्पादन बाजारात आणलेय. एसरचा नवा ‘आयकॉनिक डब्लू ३’ हा स्मार्ट टॅब्लेट आलाय.
एसरने मंगळवारी जगातील सर्वात लहान टॅब्लेट बाजारात दाखल केलाय. ‘आयकॉनिक डब्लू ३’ या छोट्या टॅब्लेटमध्ये विंडोज ८ ची ऑपरेटिंग सिस्टीम वापरली गेली आहे. हा ८.१ इंचाचा हा टॅब्लेट टचस्क्रीन आहे.
ग्राहकांची पसंती लक्षात घेता हाताळण्यास सुलभ असा टॅब्लेट बनवण्यात कंपनीने भर दिलाय, असे कंपनीचे संचालक हरीश कोहली यांनी सांगितले. भारतात या टॅब्लेटची किंमत ३०,४९९ आहे. मात्र कंपनी या महिन्यासाठी हा टॅब्लेट २७,९९९ या सवलतीच्या दरात देणार आहे. अशी माहिती मार्केटिंग ऑफिसर एस. राजेंद्रन यांनी दिली.

एसर कंपनीने ‘आयकॉनिक डब्लू ३’ बरोबरच ‘एस्पायर पी ३’ अल्ट्राबुक आणि ‘एस्पायर आर ७’ टच आणि टाईप लॅपटॉपही लॉन्च केलेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.