फेसबुकला वर्ल्डफ्लोटचा दे धक्का !

सोशल नेटवर्किंग साईड वर्ल्डफ्लोटने फेसबुकला टक्कर देण्यासाठी तरूणांना आकर्षित करण्याचा नवीन फंडा शोधून काढला आहे. वर्ल्डफ्लोटने आपल्या साईडवर फ्री सिनेमा दाखवायला सुरूवात केली आहे. वर्ल्डफ्लोट ही भारतीय सोशल नेटवर्किंग साईड आहे.

Updated: May 11, 2014, 09:11 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सोशल नेटवर्किंग साईड वर्ल्डफ्लोटने फेसबुकला टक्कर देण्यासाठी तरूणांना आकर्षित करण्याचा नवीन फंडा शोधून काढला आहे. वर्ल्डफ्लोटने आपल्या साईडवर फ्री सिनेमा दाखवायला सुरूवात केली आहे. वर्ल्डफ्लोट ही भारतीय सोशल नेटवर्किंग साईड आहे.
वर्ल्डफ्लोटचे संस्थापक पुष्कर माहट्टा यांनी सांगितलं की,`आम्ही आमच्या साईडवर ५००० हिंदी, इंग्लिश आणि भारतातील विविध भाषांमध्ये असलेले सिनेमा अपलोड केले आहेत. हे सिनेमे साईडवर टाकण्यामागे तरूणांना आणि महिलांना साईटचे आकर्षण वाढावं हाच आमचा हेतू आहे. जिथे इतर वेबसाईट सिनेमा दाखवण्यासाठी पैसे घेतात. तिथे आमच्या वेबसाईडवर सिनेमा मोफत पाहायला मिळणार आहे.`
वर्ल्डफ्लोट वेबसाईटची स्थापना २०१२ मध्ये झाली. भारतात फेसबुकचे १० कोटी युजर्स आहेत. तर या उलट वर्ल्डफ्लोट वेबसाईटचे भारतात ५ कोटी युजर्स आहेत. वर्ल्डफ्लोटच्या या युक्तीने भारतात फेसबुकला येणाऱ्या काळात नक्कीच टक्कर देईल अशी संस्थापकांची योजना आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.