फेसबुक, वय वर्षे नऊ!

प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकने आज नऊ वर्षे पूर्ण केली आहेत. 4 फेब्रुवारी २००४ मध्ये फेसबुकला सुरुवात झाली होती.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 4, 2013, 05:07 PM IST

www.24taas.com,लंडन
प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकने आज नऊ वर्षे पूर्ण केली आहेत. ४ फेब्रुवारी २००४ मध्ये फेसबुकला सुरुवात झाली होती.
जगभरात फेसबुकचे १ अब्ज युजर्स आहेत. भारतात ए. आर. रहेमान याचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. अनेक सेलीब्रेटी, नेते आणि खेळाडूही फेसबुकवरुन आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असातात. युवा वर्ग मोठ्या प्रमाणात फेसबुकशी जोडला गेला आहे.
सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग म्हणू फेसबुक ओळखले जाते. ज़ुकेरबर्ग मार्क आणि त्याच्या चार मित्रांनी २००४मध्ये फेसबुक ची संकल्पना मांडली आणि प्रत्यक्षात आणली.
सप्टेंबर २००४मध्ये फेसबुकचा कर्ता ज़ुकेरबर्ग मार्कला एका कठिण परिस्थितीचा सामना करावा लागला. त्याच्यावर चोरीचा खटला चालवला गेला. २००५नंतर फेसबुक खऱ्या अर्थाने प्रसिद्धीत आले. त्याची प्रसिद्धी दिवसागणिक वाढतच आहे.

फेसबुकचे सध्या एक अब्ज एवढे अक्टी व युजर्स आहेत. दिवसेंदिवस यामध्ये वाढच होत चालली आहे. चार फेब्रुवारी २००८ रोजी द फेसबुक.कॉम या नावाने फेसबुकची सुरवात करण्यात आली होती. मात्र, नाव बदलून फक्त फेसबुक असे करण्यात आले. फेसबुकने फक्त झुकेरबर्ग यांनाच यशाच्या शिखरावर नेताना विविध कंपन्या, विद्यार्थांनाही याचा उपयोग झालाय.
कॉमपेटे.कॉम या संकेतस्थळाने २००९ मध्ये सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांचे सर्वेक्षण केले होते. त्यावेळी फेसबुक हे जगात आघाडीवर होते, त्याचबरोबर या पेजवर सर्वाधिक अक्टीआव युजर्स होते.
एकट्या अमेरिकेमधूनच मे २०११ मध्ये तेरा कोटी ८० लाख एवढे युजर्स फेसबुकवर होते. भारतामध्ये फेसबुक वापरणाऱ्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. भारतामध्ये यंदा ही वाढ १३२ टक्यां व नी नोंदविण्यात आली आहे. जगभरातील इतर देशांपेक्षा भारतातील नवीन फेसबुकधारकांची संख्या झपाट्याने वाढत आहे.