...चला मुलींना आता नवराही विकत घेता येणार

आपला लाईफ पार्टनर शोधण्यासाठी सध्या सर्रासपणे वेबसाईटचा वापर केला जातो. पण आता मात्र तुम्हांला तुमचा नवरा चक्क विकत घेता येणार आहे.

Updated: Sep 13, 2012, 02:16 PM IST

www.24taas.com, लंडन
आपला लाईफ पार्टनर शोधण्यासाठी सध्या सर्रासपणे वेबसाईटचा वापर केला जातो. पण आता मात्र तुम्हांला तुमचा नवरा चक्क विकत घेता येणार आहे. काय खरं वाटत नाही ना...
ऍडॉप्टअगाय.कॉम या डेटिंग साइटने मुलींना योग्य वर मिळावा म्हणून एक सॉलिड आयडिया लढवली आहे. या साइटने एक ट्रॅव्हलिंग शॉप सुरू केले असून तरुणी इथे येऊन आपल्यासाठी योग्य पार्टनरची निवड करून त्याला विकत घेऊ शकतात.
या शॉपमध्ये तरुण स्वत:ची एक योग्य वर म्हणून जाहिरात करत आहेत तर आपल्यासाठी योग्य वर मिळावा म्हणून मुलींची झुंबड उडाली आहे.