www.24taas.com, वृत्तसंस्था,नवी दिल्ली
फेसबुकवर अनेक फेक प्रोफाईल बनवले जातात आणि त्याचा वापर चुकीच्या पद्धतीनं केलेला दिसतो. यावर निर्बंध बसविण्यासाठी आता इज्राइलच्या एका कंपनीनं `फेक ऑफ अॅप` बनवलं आहे ज्यात आपण फेसबुकवरचं फेक प्रोफाईल शोधण्यास मदत करत असून हे अॅप १ वर्षासाठी फ्री देखील केला आहे.
पहिले या अॅप युजर्सना पैसे भरावे लागत असे, पण आता फेसबुक युजर्सना हे अॅप वर्षभर फ्री वापरता येणार आहे. इज्राइलमधील डेव्हलपर इलिरॅन शाचारनं या अॅपचे डिझाईन केलंय. सोशल मीडियावर फेक प्रोफाईलमुळं होणारा त्रास लक्षात घेऊन या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.
फेक प्रोफाईलच्या बाबतीत भारत आणि तुर्की सर्वात पुढं आहे. मासिकांच्या अहवालानुसार, फेक प्रोफाईलची संख्या भारत आणि तुर्की सारख्या विकसित देशात जास्त आहे.
३१ मार्च २०१४पर्यंत फेसबुक युजर्सची संख्या १.२८ अब्ज असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पहिल्या तीन महिन्यातच भारत आणि ब्राझील देशात फेसबुकचा वापर वाढला आहे.
कसं काम करतं हे अॅप
फेसबुकवर अनेक फेक प्रोफाईल दिसतात. यात गुन्हेगाराचाही समावेश असू शकतो. अशा फेक प्रोफाईलवर नजर ठेवण्यासाठी फेसबुककडून प्रोफाईलचं स्कॅनिंग केलं जातं. गेल्या वर्षभराचा रेकॉर्ड तपासला जातो आणि एखादया प्रोफाईलवरुन चुकीचे किंवा हानीकारक स्टेटस अपडेट तपासून फेक प्रोफाईलचा धांडोळा घेतला जातो. त्यानंतर, फेसबुक अॅपकडून एका खास अल्गोरिदमच्या साहाय्यानं प्रत्येक प्रोफाईलला १ ते १० पर्यंत क्रमांक दिले जातात. हे अॅप https://www.fakeoff.me/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
हे अॅप लॉन्च केल्यानंतर दोन महिन्यांतच १५००० अब्ज युजर्सनी हे अॅप वापरत आहेत. शाचारनं लॉन्चिंगच्या वेळी सांगितलं की, १.३५ अब्ज युजर्समध्ये १० टक्के फेक प्रोफाईल असतात. ह्या अॅपच्या मदतीने अशा प्रोफाईलना आणि त्यांच्या अक्टेव्हिटी करण्यापासून थांबवता येईल.
शाचारच्या मते या अॅपच्या मदतीनं शोधून काढलेले फेक प्रोफाईल हे २४ टक्के तरी खरे असतात.
फेक ऑफ साहाय्यानं अल्गोरिदम प्रयोग हा पूर्ण बरोबर आहे असं म्हणता येणार नाही, पण खूप काळासाठी ह्या अॅपचा वापर करता येईल. या अॅपचा अधिकारिक पेज फेसबुक वरही येणार असून, ज्यामुळे आपण तो आपल्या कम्प्युटरवरही त्याचा उपयोग करु शकतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.