नवा गुगल ग्लास, आता सर्वकाही

गुगल ग्लासचं लेटेस्ट व्हर्जन बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे कॉम्पॅक्ट टेक्नो उपकरण म्हणून हाच ग्लास (चष्मा) मार्केटमध्ये मोठी बाजारपेठ काबीज करण्याची शक्यता आहे. गुगल ग्लासची पहिली आवृत्ती अनेकांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यातच ही नवी आवृत्ती बाजारात दाखल होत आहे. यासाठी गुगलने कंबर कसलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 11, 2013, 02:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

गुगल ग्लासचं लेटेस्ट व्हर्जन बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे कॉम्पॅक्ट टेक्नो उपकरण म्हणून हाच ग्लास (चष्मा) मार्केटमध्ये मोठी बाजारपेठ काबीज करण्याची शक्यता आहे. गुगल ग्लासची पहिली आवृत्ती अनेकांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यातच ही नवी आवृत्ती बाजारात दाखल होत आहे. यासाठी गुगलने कंबर कसलेय.
गुगलचा धोका असतानाही मार्केटमध्ये मोठी बाजारपेठ काबीज करण्यासाठी हे धाडसी पाऊल उचलण्यात आलेल. व्यक्तीच्या प्रायव्हसीत हस्तक्षेप होत असल्याच्या चर्चेकडे दुर्लक्ष करून गुगल नवीन आवृत्ती बाजारात सादर आणीत आहे. पूर्वीच्या ग्लासमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम या सुपरकॉम ग्लासमध्ये आएमएपी ४४३० एसओसी ड्यूल कोर प्रोसेसर, १ जीबी रॅम, पाच मेगा पिक्सलचा कॅमेरा, वायफाय, यूएसबी, ब्ल्यू-टूथ ही वैशिष्ट्ये कायम राहणार आहे.

या गुगल ग्लास २ मध्ये बायनाक्युलर डिस्प्ले असणार आहे. त्यामुळे इमेजेस अधिक वास्तव आणि चांगल्या दिसतील. टच सिस्टीम असलेल्या सध्याच्या गुगल ग्लासमध्ये १६ जीबी स्टोरेज मेमरी होती. ती वाढविण्याची तयारी गुगल करीत आहे. फेसबुक, ट्विटर वापरता येणाऱ्या या उपकरणात फेस रेकग्निशन तंत्र उपलब्ध असेल. चष्मा घातल्यानंतर तुम्ही नुसते `टेक पिक्चर` म्हटले तरी फोटो घेतला जातो. अत्यंत सहजपणे तुम्ही ते बघत असाल, ते व्हिडिओ रेकॉर्ड होते.
नेव्हिगेशन आणि डायरेक्शन लाइव्हपणे तयार करता येते. शब्द उच्चारून मेसेज पाठविता येतात. तुमच्या आवाजाचे सहज भाषांतर होईल. गुगल ग्लासची किंमत सुरुवातीला १५०० डॉलरला करण्यात आली. अत्यंत मर्यादित स्वरुपात ही विक्री झाली. आता ग्लासच्या पुढील व्हर्जनची बुकिंग सुरू होणार आहे. त्यासाठी गुगलच्या साइटवर ऑनलाइन बुकिंगही करता येणार आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.