www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
हिरो, हिरोइन्सनंतर भारतात राजकीय नेत्यांनाही गुगलवर सर्च केलं जातं. मात्र गुगलवर सर्च करताना येणारे पर्याय मात्र विचित्र आहेत. गुगल सर्चच्या सजेशन लिस्टमध्ये ज्या राजकारण्यांना सर्च केलं जातं, त्याच्या नावासोबत काही विचित्र सजेशन्स दिली जातात.
दिग्विजय सिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी, नरेंद्र मोदी, अटल बिहारी वाजपेयी या नेत्यांचं नाव गुगल वर सर्च करताना काहीवेळा फारच अर्वाच्य पर्याय दिले जातात. दिग्विजय सिंग यांचं नाव सर्च करताना ‘दिग्विजय सिंग कुत्रा आहे’, ‘दिग्विजय सिंग ख्रिश्चन आहे’ असे अनेक चुकीचे पर्याय दिसतात. तसंच सोनिया गांधींच्या नावाचं सर्च केल्यास त्या हेर असल्याचा पर्याय सजेशन लिस्ट सुचवते. याहूनही आक्षेपार्ह आणि अश्लील पर्याय सोनिया गांधींच्या सजेशन लिस्टमध्ये दिसतात. राहुल गांधी हा जोक असल्याचं गुगल सर्च सुचवतं.
नरेंद्र मोदी हे गुन्हेगार आहेत. नरेंद्र मोदी अविवाहित आहे असे पर्याय गुगल सर्च देतं. तर अटलबिहारी वाजपेयी मृत्यू पावल्याचंही सजेशन गुगल सर्च देतो. गुगल देत असलेलं सजेशन हे गुगलने तयार केलेले नसतात. सर्च करणारे लोक जे वाक्य सर्वाधिक वेळा टाईप करतात, ते वाक्यच सजेशन लिस्टमध्ये दिसतं. त्यामुळे भारतीय राजनेत्यांबद्दल जनतेचं मत काय आहे, याचाही इशारा गुगल सर्च सजेशन लिस्टमध्ये मिळतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.