www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अलिकडेच निस्सान कंपनीने आपल्या १० लाख मोटार कार परत माघारी मागविण्याचा निर्णय घेतला आहे. या कार सदोष असल्याचे कारण देत परत मागविण्यात आल्या आहेत. आता निस्सान कंपनीच्या पावलावर पाऊल ठेवत मारुती सुझुकी इंडिया कंपनीही एक लाख `डिझायर` गाड्या मागे घेणार आहे.
मारुती सुझुकी इंडिया ही कार उत्पादक कंपनी आपल्या एक लाख डिझायर कार मागे घेणार आहे. तशी सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे. दोषयुक्त इंधन टाक्या बदलण्यासाठी या गाड्या मागे घेण्याचा निर्णय कंपनीकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबात कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिलाय.
मारुती सुझुकी कंपनीने वितरकांकडे असलेल्या स्टॉकमधील कारच्या इंधन टाकीला जोडलेले फिलर बदलणे सुरू केले आहे. या उणिवांमुळे जवळपास एक लाख डिझायर गाड्यांना फटका बसू शकतो. आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये कंपनीने एक लाख ९७ हजार डिझायर गाड्यांची विक्री केलीय. तर मार्चमध्ये कंपनीने देशांतर्गत बाजारपेठेत एकूण १७ हजार २३७ गाड्या विकल्या आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.