www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारत देशातील सर्वात मोठी कार कंपनी म्हणून मारूतीकडे पाहिले जाते. या मारूती कंपनीने नवीन स्पोर्टी कार लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी किमतीत वॅगन आर स्टिंगरे कार आणली आहे.
या गाडीचा लूकही जबरदस्त आहे. या कारचे मार्केटमध्ये तीन नवीन मॉडेल असणार आहेत. मॉडल [Lxi, Vxi and Vxi (O)] या कारची किंमत ४ लाख १० हजार रूपयांपासून ४ लाख ६७ हजार या दरम्यान असणार आहे.
मारूती उद्याग समूहाचे सीईओ मयंक पारीख यांनी सांगितले की, ही वॅगन आर या कारच्या धर्तीवर आधारित आहे. या कारला स्पोर्टी लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कारचे डिझाइनही बदलण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही कारमधील फरक तुमच्या लक्षात लगेच येईल.
ब्लॅक इंटिरियरपासून ते ड्रायव्हर साईट एअरबॅग आणि अॅंटी स्कीट ब्रेक याचाही पर्याय या कारमध्ये असणार आहे. या बदलाबरोबरचे वॅगन आरच्या धर्तीवर या गाडीची किंमत ठेवण्यात आली आहे. वॅगन आर स्टिंगरे कार यामध्ये स्पर्धा निर्माण होईल.
स्टिंगरे वॅगन आर ही कार १ सीसी पेट्रोल इंजिनची असेल. स्टिंगरे ही गाडी वॅगन आरच्या धर्तीवर असेल. या कारचे स्टायलिश पुढील लाईट असतील. रियर वायपर स्पोर्टी लूक देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या कारची किंमत ४.१० ते ४.६७ लाख दरम्यान आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार २०.५ किमी प्रति लीटर मायलेज देईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.