मोबाईल कंपन्याचा ‘ब्लॅकआऊट डे’

तुम्ही नव वर्षानिमित्ताने आपल्या मोबाईलवरून कोणाला शुभेच्छा संदेश पाठविणार असाल तर तुम्हाला महाग पडणार आहे. कारण मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी हे दोन दिवस ‘ब्लॅकआऊट डे’ म्हणून जाहीर केले आहेत. त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 31, 2012, 11:14 AM IST

www.24taas.com,मुंबई
तुम्ही नव वर्षानिमित्ताने आपल्या मोबाईलवरून कोणाला शुभेच्छा संदेश पाठविणार असाल तर तुम्हाला महाग पडणार आहे. कारण मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी हे दोन दिवस ‘ब्लॅकआऊट डे’ म्हणून जाहीर केले आहेत. त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील.
आघाडीच्या सर्वच मोबाईल कंपन्यांनी ‘ब्लॅकआऊट डे’ जाहीर केला आहे. तसा कंपन्यांकडून गेले दोन दिवस मोबाईलधारकांना एसएमएस पाठविण्यात येत आहे. बीएसएनएलपासून एमटीएनएल ते एअरटेल, रिलायन्स, वोडाफोन, आयडिया, एअरसेल, युनिनॉर, व्हिडिओकॉन, टाटा, लूप या कंपन्यांनी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी हे दोन दिवस ‘ब्लॅकआऊट डे’ म्हणून जाहीर केले आहेत.
३१ डिसेंबर २०१२ आणि १ जानेवारी २०१३ या दिवशी एसएमएस पॅकची कोणतीही सवलत ग्राहाकांना मिळणार नाही. एसएमएम करायचा असेल तर कंपन्या नियमीत पैसे वसूल करणार आहेत. दोन दिवसांपासून ‘ब्लॅकआऊट डे’ चा एसएमएस पाठविण्यात आल्याने तक्रार करण्यास जागा उरलेली नाही. त्यामुळे शुभेच्छा संदेश किंवा मॅसेज पाठविणे महाग झाले आहे.
प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांना किंवा विशेष फोन प्लॅन असणा-या मोबाईल धारकांना यातून कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. नववर्षाला शुभेच्छा देण्यासाठी एसएमएससेवेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या संधीचा फायदा उठवण्यासाठी मोबाईल कंपन्या एसएमएससाठी चढे दर लावतात. मोबाईल एसएमएसला पर्याय म्हणून इंटरनेटवरुन एसएमएस पाठवण्याची सोय उपलब्ध आहे.
मोबाईल कंपन्यांनी एसएमएससाठी स्पेशल चार्जेस लावलेत. त्यामुळे मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना याचा फायदा होणार असून, पोस्टपेड आणि प्रीपेड ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. यातील व्यावसायिकता लक्षात घेऊन ‘ब्लॅकआऊट डे’ जाहीर करण्यात आला आहे.