www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ऐन वेळेस मोबाईलची बॅटरी संपणं ही आता नेहमीचीच गोष्ट झालीय... पण, याची तीव्रता त्यावेळी ध्यानात येते जेव्हा आपल्याकडे मोबाईल पुन्हा चार्ज करण्यासाठी ऑप्शनच उपलब्ध नसेल... आणि मग आपली महत्त्वाची कामंही अडून बसतात.
परंतु, आता तुमच्या या समस्येचं समाधानही उपलब्ध झालंय. आता, तुमच्या डेबिट कार्डाच्या आकाराचा एक छोटासा ट्रॅव्हल कार्ड तयार करण्यात आलंय. याला तुम्ही तुमच्या पर्समध्येही ठेऊ शकता. हे ट्रॅव्हल कार्ड आयफोनला लाईटनिंग ऑप्शनने चार्ज करू शकतो. तर इतर हॅन्डसेटसाठी यूएसबीचा पर्याय उपलब्ध आहे. `गो डिझाईन` कंपनीनं हे ट्रॅव्हल कार्ड निर्माण केलंय.
स्मार्टफोनमध्ये बॅटरीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अनेकदा दिवसातून एकदा तरी या फोन्सला चार्ज करण्याची गरज भासते. याच्यावर उपाय म्हणजे एखादी एक्स्ट्रा बॅटरी तुमच्यासोबत ठेवणं किंवा एखादा चार्जर आपल्याजवळ बाळगणं...
इतर चार्जर्सपेक्षा ट्रॅव्हल कार्ड वजनानं आणि आकारानं छोटं असल्यानं ते पॉकेटमध्ये अलगदरित्या ठेवता येतं... त्यामुळे तुमचा स्मार्टफोनही सहजगत्या रिचार्ज करता येऊ शकतं. हे कार्डाची जाडी अवघी ४.७७ मिमी आहे. त्याचं वजन आहे केवळ ५६.७ ग्राम... यामध्ये १३०० एमएएचची बॅटरी आहे त्यामुळे पाच तासांचा टॉकटाईम मिळू शकतो... किंवा ९८ तासांचा स्टँडबाय टाईम... केवळ ७५ मिनिटांमध्ये हे कार्ड चार्ज होऊ शकतं.
जर तुमच्याकडे आयफोन आणि अँन्ड्रॉईड फोन असतील तर तुम्हाला दोन कार्ड विकत घ्यावे लागतील. कारण दोन्ही हॅन्डसेटसाठी वेगवेगळे चार्जर आहेत. भारतात याची किंमत जवळजवळ ३००० रुपये असू शकेल. लवकरच हे कार्ड बाजारात उपलब्ध होईल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.