www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
जपानची कंपनी पॅनसॉनिकने आपला नवीन डुअल सिम हँडसेट P81 बाजारात लाँच केला आहे. कंपनीने या फोनचा प्रचार गेले काही दिवसांपासून सोशल मीडियावर करत आहे. नवीन फिचर्स असलेल्या या स्मार्टफोनची किंमत १८ हजार रूपयांपेक्षा ही कमी आहे. तसेच स्नॅपडीलवर या स्मार्टफोनची किंमत १७,९९९ रूपये इतकी आहे.
या स्मार्टफोनमध्ये १.७ जीएचझेडचं मीडियाटेक ऑक्टा कोर चिपसेट आहे. हा स्मार्टफोन एन्ड्रॉयड ४.२ वर आधारीत आहे. यात १ जीबी रॅम आहे. याची स्टोरॅज क्षमता ८ जीबी आहे. यात ३२ जीबी एक्सटर्नल कार्ड चालतं.
या स्मार्टफोनची स्क्रीन ५.५ इंच हाय डेफिनिशन आहे. याचा रिअर कॅमेरा १३ एमपी आणि फ्रंट कॅमरा 2 एमपी आहे. हा ड्युएल सिम मोबाईल आहे. या शिवाय अन्य फिचर्समध्ये ३जी, वायफाय, जीपीएस आणि ब्लूटुथ हे देखील आहे. यात एफएम देखील आहे. तसेच याची बॅटरी २५०० एमएएच इतकी आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.