विशाल करोळे, www.24taas.com, औरंगाबाद
टीव्ही आणि खेळण्यातील रोबो आपण नेहमी पाहतो. परंतु विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोंची कुस्ती प्रत्यक्षात पाहता आली तर त्यासारखा दुसरा कोणता अनुभव नाही. असाच अनोखा अनुभव गोव्यात भरवलेल्या स्पर्धेत अनेकांनी घेतला. या स्पर्धेत औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
एकाच वेळी तीन तीन रोबोंना चीत करणाऱ्या व्हेलोसी रायझर्स या रोबोनं भल्या भल्या रोबोंना जमीनदोस्त केलं आहे. आयआयटी पवईतील आशिया पातळीवरील टेकफेस्ट , गोव्यातील बीट्स पिलानीची रॉयल रंबल स्पर्धा आणि राष्ट्रीय पातळीवरील रोबो वॉर... या तिन्ही स्पर्धेमध्ये या रोबोनी प्रतिस्पर्धी रोबोला उलथवून टाकण्याची ताकद दाखवली आहे... हा रोबो तयार केलाय औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी... गोवा इथं बीट्स पिलानीत नुकत्याच पार पडलेल्या रॉयल रंबल स्पर्धेतही या महाविद्यालयाच्या वेलोसी रायझर्स संघानं अजिंक्यपद कायम राखलंय.
या रोबोचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं डिझाईन...स्ट्रक्चलर डिझायनिंग,बॅलन्सिंग, वेपन सिस्टीम डिझाईन आणि मॅन्युफॅक्च रिंग या गोष्टींवर भर दिला जातो. रोबोत महत्त्वाची असलेली मोटार खुबीने लपवण्यात आलींय.हा बहुउपयोगी रोबो विद्यार्थ्यांनी काटकसरीनं तयार केलाय.
लाखो रुपये खर्चून तयार केलेल्या रोबोंपुढे अवघ्या साठ हजारांत टेक्निककली मजबूत असा हा रोबो सरस ठरला...विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांना सरकारी पाठबळ मिळाले तर भविष्यात या रोबोंचे अनेक प्रगत व्हर्जन्स तयार होतील हे निश्चित