www.24taas.com, वृत्तसंस्था, सेऊल
मोबाईल फोनच्या बाजारात सॅमसंगनं नवा धमाल फोन बुधवारी लॉन्च केलाय. सॅमसंगनं लॉन्च केलेल्या ‘गॅलॅक्सी नोट’सोबतच आणखी एक ‘स्मार्ट कर्व्ह्ड डिस्प्ले’ फोन ज्याची स्क्रीन फ्लेक्सिबल आहे असा फोन बाजारात आणलाय. काल कोरियात याचं लॉन्चिंग करण्यात आलं.
होम स्क्रिन बंद असतानाही मिस कॉल आणि बॅटरी लाईफ पाहण्याची सोय या नव्या फोनमध्ये आहे. वळणदार आकारामुळं फोन हातात धरताना चांगली ग्रिप मिळेल. व्हिडिओ पाहतानाही वेगळा अँगल मिळेल, असा दावा कंपनीनं केलाय.
‘एलजी`नं पुढील वर्षी आपल्या वळणदार फोनचं उत्पादन सुरू करण्याचं जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ‘सॅमसंग`नं हा फोन सादर केला. ‘एलजी`ला शह देण्यासाठी ‘सॅमसंग`नं हे पाऊल उचललंय. मात्र, सध्या सादर करण्यात आलेला हा नवा फोन प्रतिकात्मक आहे. ‘सॅमसंग`कडे या फोनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची क्षमता नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे.
असा आहे ‘गॅलॅक्सी राऊंड` डिस्प्ले:
> ५.७ इंच जाडी
> ७.९ मिमी वजन जे की गॅलॅक्सी नोट पेक्षाही कमी आहे.
> १५४ ग्रॅम बॅटरी
> २८०० एमएएच कॅमेरा
> १३ एमपी ओएस: अॅन्ड्रॉईड ४.३
सॅमसंगचा हा मोबाईल यपोन दक्षिण कोरियातल्या सगळ्यात मोठ्या मोबाईल स्टोअर्सजवळ आहे. या फोनची किंमत १.०८९ मिलियन वॉन (जवळपास १००० डॉलर) इतकी आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.