www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
मोबाईलच्या युगात आता ‘एसएमएस’ला खूप महत्व प्राप्त झाले आहे. आता सरकार या ‘एसएमएस’ला ग्राह्य पुरावा म्हणून पाहणार आहे. योजनांची माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी ‘एसएमएस’ पुरेसा आहे.
आता यापुढे मोबाईलवरून पाठविण्यात येणारी थोडक्यात माहितीसुद्धा सरकारी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. विविध सरकारी योजना व सरकारी कार्यालयांतील कामांसाठी अलीकडच्या काळात ‘एसएमएस’द्वारे माहितीची देवाणघेवाण होते.
बर्याच योजनांसाठी करण्यात येणारी नावनोंदणी तसेच आवश्यक असणारी माहितीसुद्धा मोबाईलच्या माध्यमातून पाठविण्याची सुविधा विविध सरकारी कार्यालयांतून उपलब्ध करून दिली जाते. त्यासाठी करण्यात येणारे एसएमएस यांना सरकारी पुरावा (डॉक्युमेंटरी प्रूफ) म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
दरम्यान, याआधी माहितीचा अधिकार, आरोग्य योजना, आधार, शिक्षण आदींसाठी सध्या एसएमएसचा वापर केला जात आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.