www.24taas.com,जिनेव्हा
एक लिटर डिझेलमध्ये १११ किमी कार धावेल, यावर आपला विश्वास बसेल का?, एका लिटरमध्ये १११ किमी. नाही ना! मात्र, ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात येत आहे. जर्मनीतील एका कंपनीने अशी कार बाजारात आणण्याची हालचाल सुरू केलीय.
जर्मनीतील कार निर्माता कंपनी फॉक्सलवेगन हाईब्रिड एक्सएल-१ या नावाची कार बाजारात आणणार आहे. जिनेव्हातील एका मोटार शोमध्ये या कार मॉडेलबाबतची संकल्पना मांडण्यात येणार आहे.
फॉक्सपवेगनने दावा केला आहे की, दोन सीटची ही कार एक लीटर डिझेलमध्ये १०० किलोमीटर पेक्षा अधिक चालेल. या कारच्या आरशामध्ये कॅमेरा बसविण्यात आलाय. त्यामुळे या कारचे दरवाजे उघडताना वरती जातील. या कारमध्ये सात गिअर असतील. दोन क्लज गिअर बॉक्स बसविण्यात आलेत. अधिक मायलेज देण्यासाठी या कारच्या एयरोडायनेमिक डिझाईन असणार आहे. ही कार सहा महिन्यात बाजारात येईल.
कंपनीच्या सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार २७ हॉर्सपॉवरचे इलेक्ट्रिक इंजिन याशिवाय दोन सिलिंडर का इंजिन बसविण्यात येणार आहे. या कारची इंजिनची ताकद (पॉवर) ४७ बीएचपी वाढविणार आहे. ही कार जर्मनीतील ओसनाब्रुएक कारखान्यात तयार केली जाणार आहे. ही कार अत्याधुनिक तंत्रज्ञानावर बनविलेली असेल. या कारची किंमत ३० ते ५० हजार युरो म्हणजेत २१ ते ३५ लाख रूपये असेल. या कारचे वजन कमी करण्यावर भर असेल. ८०० किलो वजनाची ही कार असेल, असे कंपनीकडून सांगण्यात आलंय. वर्षाला १००० कार बनविण्यात येणार आहेत.