`वायफाय` सेवेत बिजिंग आणि लंडनपेक्षा बिहारपुढे

बिहार सरकारने राज्यातील निवडक भागात वायफाय सेवा देण्यास सुरूवात केली आहे. या प्रकारची वायफाय सेवा जगात याआधी लंडन आणि बिजिंगमध्येच उपलब्ध होती.

Updated: Feb 25, 2014, 11:05 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पाटणा
बिहार सरकारने राज्यातील निवडक भागात वायफाय सेवा देण्यास सुरूवात केली आहे. या प्रकारची वायफाय सेवा जगात याआधी लंडन आणि बिजिंगमध्येच उपलब्ध होती.
लंडनमध्ये अडीच किलोमीटर तर बिजिंगमध्ये सर्वात लांब तीन किलोमीटरच्या पट्यात ही वायफा सेवा उपलब्ध आहे.
बिहारमध्ये ही सेवा २० किलोमीटरपर्यंत असणार आहे. जो जगातला सर्वात लांब वायफाय पट्टा म्हणून ओळखला जाईल.
मोफत वायफाय सेवेची सुरूवात याआधी बंगलोरमध्येही सुरू करण्यात आली होती, मात्र ती अजून प्राथमिक टप्प्यात आहे.
बिहार सरकारची ही योजना पाटण्यातील काही भागात परीक्षणासाठी सध्या सुरू करण्यात आली आहे.
बिहार सरकारच्या या योजनेनंतर आपले लॅपटॉप आणि स्मार्टफोन नागरीक पाटण्याच्या गांधी मैदानात घेऊन येत आहेत.
या वायफायवर डाऊनलोडिंग, टोरेंट, प्रौंढांसाठीच्या साईट बंद असतील, यू-ट्यूब आणि लाईव्ह व्हिडीओ मात्र पाहता येणार नाहीत.
किती डाऊनलोड आणि अपलोड करता येईल, याची मर्यादा अजून ठरलेली नाही. 512 केबीपीएस स्पीड देण्याचा बिहार सरकारचा प्रयत्न असेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.