युनिनॉरची मुंबईतील मोबाईल सेवा कायमची बंद

युनिनॉर या मोबाईल सेवा कंपनीची मुंबईतील सेवा बंद झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कंपनीनं आपली सेवा बंद केली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 17, 2013, 10:47 AM IST

www.24taas.com,मुंबई
युनिनॉर या मोबाईल सेवा कंपनीची मुंबईतील सेवा बंद झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कंपनीनं आपली सेवा बंद केली आहे.
कंपनीचा परवानाही यापूर्वीचं रद्द करण्यात आलाय. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे शहर मिळून युनीनॉरचे एकूण १८ लाख ग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांना आता दुस-या कंपनीकडे वळावे लागणार आहे.
दरम्यान युनीनॉरची उर्वरीत महाराष्ट्रातील सेवा सुरु आहे. फेबुवारी २०१२ मध्ये सुप्रीम कोर्टानं युनीनॉरचे २२ लायसन्स रद्द केलेत.

मुंबईतील कर्मचाऱ्यांवर गदा येणार नाही. त्यांना अन्य सर्कलमध्ये सामावून घेतले जाईल, असे कंपनीच्या प्रवक्त्यांने स्पष्ट केले आहे. त्यामुळे थोडासा कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
नव्याने झालेल्या लिलावात सहभागी न झाल्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार युनिनॉरची मुंबईतील सेवा बंद झाली आहे. मात्र महाराष्ट्र-गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश पूर्व, उत्तर प्रदेश पश्चिम, बिहार आणि झारखंड या सहा परिमंडळांतील युनिनॉरच्या ग्राहकांना मुंबईत रोमिंग सेवा मिळणार आहे.