जाधव - तटकरे यांच्यातला संघर्ष शिगेला, पवारांचा हस्तक्षेप

कोकणातल्या राष्ट्रवादीचे २ दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आणि जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्यातला संघर्ष शिगेला पोहोचलाय. हे दोन नेते एकमेकांना पाण्यात पाहत असताना आता त्यांच्यातला वाद मिटवण्यासाठी पवारांना हस्तक्षेप करावा लागतोय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 3, 2013, 12:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोकणातल्या राष्ट्रवादीचे २ दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आणि जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्यातला संघर्ष शिगेला पोहोचलाय. हे दोन नेते एकमेकांना पाण्यात पाहत असताना आता त्यांच्यातला वाद मिटवण्यासाठी पवारांना हस्तक्षेप करावा लागतोय.
पवारांनी यासाठी तटकरे - जाधव यांच्यासह राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आज बोलावलीय... कोकणातल्या साहित्य संमेलनापासून या दोघा नेत्यांमधला वाद वाढत गेला. जाहीर कार्यक्रमातूनही एकमेकांवर चिखलफेक केली.
एकीकडे रायगड आणि रत्नागिरीत राष्ट्रवादीची ताकद वाढत असताना या दोन नेत्यांमधला संघर्ष राष्ट्रवादीला परवडणारा नाही. त्यामुळे आता शरद पवार स्वत: पुढे सरसावलेत...दरम्यान, धुळे, नंदुरबारमधील राष्ट्रवादीच्या पिछेहाटीबाबतही बैठकीत मंथन होईल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.