हाणामारीनंतर आज परिवहन समितीची निवडणूक

आज ठाणे परिवहन समितीच्या सभापतीपदाची निवडणूक होतीये... या निवडणूकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी करण्यात आलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 23, 2013, 08:49 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
आज ठाणे परिवहन समितीच्या सभापतीपदाची निवडणूक होतीये... या निवडणूकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी करण्यात आलीय.

एकतर्फी होणाऱ्या या निवडणुकीत लोकशाही आघाडीनं ऐनवेळी शिवसेनेच्या बंडखोर शेलेश भगत यांना आपला उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभं केल्यानं या निवडणुकीत आता ऎन थंडीत ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलंच गरम झालंय.
भगत यांच्या बंडखोरीनं बुधवारी ठाणे महापालिकेच्या आवारात राजकीय हाणामारीही झाली होती. त्यामुळं आज होणारी निवडणूक गाजणार हे निश्चित आहे.. आज सकाळी साडे दहा वाजता ही निवडणूक होणार असून याकरिता महापालिका मुख्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
निवडणूकीला असलेली गोंधळाची पार्श्वभूमी लक्षात घेता निवडणूकीदरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालिकेनं अतिरिक्त पोलिस बंदोबस्तही मागवलाय..

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.