गुन्हा दाखल : जितेंद्र आव्हाड मोकाट

झोपडपट्टीवासीयांसाठी तब्बल दीड तास रेल्वे रोको करुन हजारो प्रवाशांना वेठिस धरणा-या आमदार जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल झालाय. मात्र त्यांना अजूनही अटक झालेली नाही. ते राजकीय नेते असल्याने त्यांना पोलीस अटक करण्यास धजावत नसल्याने ते मोकाट आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 6, 2012, 10:21 PM IST

ww.24taas.com,ठाणे
झोपडपट्टीवासीयांसाठी तब्बल दीड तास रेल्वे रोको करुन हजारो प्रवाशांना वेठिस धरणा-या आमदार जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल झालाय. मात्र त्यांना अजूनही अटक झालेली नाही. ते राजकीय नेते असल्याने त्यांना पोलीस अटक करण्यास धजावत नसल्याने ते मोकाट आहेत.
कळव्याच्या मफतलाल कंपनीच्या जमिनीवरील झोपड्यांवरील कारवाईच्या विरोधात जितेंद्र आव्हाड यांनी रेल रोको केला होता. या प्रकरणी त्यांच्यावर दंगल माजवणे, रेल्वे थांबवण्याचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणातील इतर आरोपींना अटक झालीये. मात्र आव्हाड यांना अजुनही अटक झालेली नाही.
बुधवारी सकाळी आव्हाड यांनी कळव्यातल्या झोपड्या हटवू नयेत, यासाठी रेलरोको आंदोलन छेडलं. या प्रकरणाशी कोणताही संबंध नसलेल्या लाखो लोकल रेल्वे प्रवाशांना त्यांनी वेठीला धरलं. ऐन गर्दीच्या वेळी तब्बल १०० लोकल्स रद्द कराव्या लागल्या. एकीकडे प्रवासी त्रस्त असताना झोपडीवासियांसाठी नियोजित असलेलं सर्वपक्षीय आंदोलन आव्हाडांनी हायजॅक केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलाय.