आमदारावर नगरसेविकेच्या मुलाच्या अपहरणाचा गुन्हा

डोंबिवलीतील भाजपच्या नगरसेविका अर्चना कोठावदे यांच्या अपहरण प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे.

Updated: May 28, 2014, 09:22 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
डोंबिवलीतील भाजपच्या नगरसेविका अर्चना कोठावदे यांच्या अपहरण प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे.
अर्चना कोठावदे यांचे डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समिती निवडणुकांच्या वेळी अपहरण झाल्याचा आरोप भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी केला होता. तशी तक्रार कोठावदे यांच्या मुलाने रामनगर पोलिस ठाण्यात दाखल केली होती.
मात्र ही तक्रार आपल्या मुलाला दबावापोटी दाखल करण्यास सांगण्यात आल्याची तक्रार अर्चना कोठावदे यांनी नाशिकमध्ये केलीय. आपल्या मुलाचं अपहरण करुन, त्याला धमकावून ही तक्रार दाखल करण्यात आल्याचं अर्चना कोठावदे यांनी या तक्रारीत म्हटलंय.
नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्याकड़ून भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण, नगरसेवक रवी पाटील, शिवसेनेचे नाशिकचे नगरसेवक अजय बोरस्ते आणि डीजी सूर्यवंशी यांच्यासह आणखी काही जणांवर या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामुळे या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.