www.24taas.com,कल्याण
कल्याण-डोंबिवली महापालिकेत ठेकेदाराला मारहाण केल्याप्रकरणी मनसे नगरसेवक नितीन निकम यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण पूर्व भागातल्या सिद्धार्थनगरमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली म्हणून ठेकेदाराला मारहाण केली करण्यात आली. सर्वांसमोर निकम या नगरसेवकांनं ठेकेदाराच्या सात ते आठवेळा श्रीमुखात भडकावली. दुसरीकडे मनसे कार्यकर्त्यांकडून या मारहाणीचं समर्थन करण्यात येतय.
संतापाच्या भरात लोकप्रतिनिधी कोणत्या थराला जाऊ शकतात याचं उत्तम उदाहरण कल्याण-डोंबिवली महापालिकेत पाहायला मिळावलं. मुळात पाईपलाईन फुटली म्हणून ठेकेदाराला मारहाण करण्याचा अधिकार नगरसेवकांना कुणी दिला, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या मारहाण प्रकरणी मनसेचे वरिष्ठ नेते काही कारवाई करेल क, याकडेच सर्वांचं लक्ष लागलय.