www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई
रोजच्या जेवणात आवश्यक असलेला कांदा ४० रुपये किलो झालाय. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये कांदा आज ३२ ते ३४ रुपये किलो झालाय.
होलसेल बाजारात ३३ रुपये किलोनं असलेला कांदा किरकोळ बाजारात तब्बल ४० रुपयांवर पोहोचलाय. महत्त्वाचं म्हणजे कांद्याचा तुटवडा पुढचा दीड महिना कायम राहणार असल्यानं कांद्याचे भाव पुढचा दीड महिना तरी चढेच राहणार आहेत.
यावर्षी पडलेल्या दुष्काळामुळे कांद्याचं उत्पादन कमी झालं. त्यामुळे कांद्याचा तुटवडा भासतोय. सप्टेंबरच्या १५ तारखेपासून नवा कांदा बाजारात यायला सुरुवात होईल, असा अंदाज आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.