www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
पश्चिम मार्गावर एक लोकला आग लागल्याने प्रवाशांबरोबरच रेल्वे अधिकाऱ्यांची धांदळ उडाळी. रेल्वेला आग लागली पळा पळा, अशी स्थिती ठाणे रेल्वे स्टेशनमध्ये पाहायला मिळाली. याचा फटका मध्य रेल्वेला बसला. सायंकाळी उशिरापर्यंत गाड्या जलद गती मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडलेले होते.
सायडिंगला उभ्या असलेल्या रिकाम्या उपनगरी रेल्वेच्या पाचव्या क्रमांकाच्या डब्याच्या मोटरकोचला आग लागल्याने रेल्वे यंत्रणेची प्रचंड धावपळ झाली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ४.१० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे डाऊन (कल्याणकडे) धीम्या गती मार्गावरील लोकल सेवा काही काळ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंद ठेवत सेवा डाऊन जलद गती मार्गावर वळवण्यात आली होती.
ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबतचे कारण मात्र समजू शकले नाही. मात्र, या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांसह सर्वांनीच ठाणे स्थानकातील या घटनेची माहिती घेतली.
अग्निशमनसह रेल्वेच्या सुरक्षा विभागाच्या व तांत्रिक विभागाच्या गाड्या धीम्या गतीच्या डाऊन ट्रॅकवरून पुढे आणल्या होत्या. अग्निशमन दलाच्या पाण्याचे पाइपलाइन स्थानकातून घटनास्थळावर नेण्यात आले होते. आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविण्यात यश आले. दरम्यान, या आगीची चौकशी करण्यासाठी रेल्वेने एक समिती नेमली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.