परप्रांतीय विक्रेत्याने केला शाळकरी मुलीवर बलात्कार, खून

रायगड जिल्ह्यात पाली तालुक्यात कामतेकर गावात एका शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याचा उघड झालंय. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने खून केल्यानंतर प्रियंका परबचा मृतदेह शेतात गाडला होता.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 18, 2012, 09:09 PM IST

www.24taas.com, रायगड
रायगड जिल्ह्यात पाली तालुक्यात कामतेकर गावात एका शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याचा उघड झालंय. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने खून केल्यानंतर प्रियंका परबचा मृतदेह शेतात गाडला होता.
प्रियांकाच्या कुटुंबियांची सकाळी शोधाशोध सुरू असताना गावात रूद्राक्षाच्या माळी विकण्यासाठी एक परप्रांतीय आला. तो विक्रेताच काल प्रियांकाचा पाठलाग करत असल्याचं काही गावक-यांनी पाहिलं होतं. त्या विक्रेत्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर त्यानं गुन्हा कबूल केला. ग्रामीण भागात पोलीस पेट्रोलिंग करत नाहीत.
परप्रांतिय भंगारवाल्यांकडून पोलीस हप्ते घेत असल्यानं गावात कोणीही व्यक्ती येत असल्याचा आरोप गावक-यांनी केलाय. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गावक-यांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केलीय.