ठाणे : सूरज परमार आत्महत्या प्रकरणी आता नवं वळण लागलंय. या प्रकरणी आत्तापर्यंत अनेक नगरसेवकांची चौकशी झालीय. चार संशयित नगरसेवकांना अटकही झालीय.
पण त्यात आता ठाण्यातले वास्तूविशारद प्रवीण जाधव यांचीही ठाणे पोलिसांनी चौकशी केलीय. प्रवीण जाधव हे कॉसमॉस ग्रूपचे वास्तुविशारद आहेत. तपास अधिकारी एसीपी गोरे आणि त्यांच्या सहका-यांकडून जाधव यांची कसून चौकशी कऱण्यात आली.
प्रवीण जाधव याची ठाणे महानगरपालिकेत नगरविकास खात्यात चलती आहे. सेटींग करण्यात त्याचं प्राविण्य आहे, असं बोललं जातंय. सेटलमेंट मध्ये कुशल असलेल्या वास्तुविशारदाची चौकशी झाल्यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिकांचं धाबे दणाणलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.