अजूनही स्थायी समिती नाहीच, ठाणेकर संतप्त

ठाणे पालिकेच्या स्थायी समितीसाठी राजकारण्यांमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेमुळं सामान्य जनतेचे हाल होत आहेत. निधी अभावी अनेक कामं रखडली आहेत. त्यामुळं संतप्त ठाणेकरांनी नेत्यांना आंदोलनाचा इशारा दिलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 18, 2012, 09:36 AM IST

www.24taas.com, ठाणे
ठाणे पालिकेच्या स्थायी समितीसाठी राजकारण्यांमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेमुळं सामान्य जनतेचे हाल होत आहेत. निधी अभावी अनेक कामं रखडली आहेत. त्यामुळं संतप्त ठाणेकरांनी नेत्यांना आंदोलनाचा इशारा दिलाय.
ठाण्यात स्थायी समितीसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. बुद्धीबळातल्या खेळाप्रमाणे शहकाटशहचं राजकारण रंगलंय. कधी युती मात देते तर कधी आघाडीची सरशी.मात्र निवडणुका होन सहा महिने उलटल्यानंतरही स्थायी समिती स्थापन झालेली नाही. राजकारण्याच्या या सत्तासंघर्षात सामान्य जनता मात्र भरडली जातेय. अनेक समस्यांबाबत जनतेकडून जाब विचारला असता निधी नसल्याचं सांगत नगरसेवक हात वर करत आहेत. ठाणेकरांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पेट्रोल,डिझेल जकात कर कमी करण्याचा प्रस्ताव तसाच आहे.. परिवहन संदर्भातली प्रश्नांचीही तशीच अवस्था आहे.. त्यामुळं आता नेत्यांच्या या राजकारणावर ठाणेकरांमध्ये संतापाची भावना आहे..
तर दुसरीकडे स्थायी समितीच्या या मुद्यावरुन राजकारणी मात्र एकमेंकावर आरोप प्रत्यारोप करण्यात मश्गुल आहेत. या चिखलफेकीमुळं सामान्य ठाणेकरांच्या समस्यांचं सोयरसूतक नेतेमंडळींना नसल्याचा आरोप होतोय. त्यामुळं ‘आता तरी स्थायी समितीचा प्रश्न सोडवा अन्यथा जनआंदोलनासाठी तयार रहा’ असा इशारा ठाणेकरांनी या राजकारण्यांना दिलाय.