माळशेज घाटातून एकेरी वाहतूक सुरू

कल्याण-अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटातील वाहतूक आठ दिवसानंतर सुरू झाली आहे. काहीप्रणात दरड हटविण्यात राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला यश आलेय. त्यामुळे माळशेज घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. अद्याप हा घाट धोकादायक आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 1, 2013, 11:02 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
कल्याण-अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटातील वाहतूक आठ दिवसानंतर सुरू झाली आहे. काहीप्रणात दरड हटविण्यात राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला यश आलेय. त्यामुळे माळशेज घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. अद्याप हा घाट धोकादायक आहे.
माळशेज घाटाच्या मध्यावर्ती ठिकाणी दरड कोसळली. कल्याण-अहमदनगर या मार्गावर दरड कोसळ्याने दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दरड बाजुला करण्यात तीन दिवस लागतील असे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात दरड बाजुला करण्यात आठ दिवस गेले. त्यानंतर एकेरी वाहतूक सुरू झाली आहे.
दरड कोसळल्यानंतर वाहतूक ठप्प पडली होती. तसेच या मार्गाने वाहतूक करू नये, असे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान, माळशेज घाटात गेल्या महिन्याभारापासून मुसळधार पावसामुळे कल्याण आणि अहमदनगरला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२वरील वाहतूक दरड कोसळल्यामुळे पूर्णपणे वाहतूक बंद होती. ही दरड एका टेम्पोवर कोसळल्याने या दुर्घटनेत टेम्पो मालक रघुनाथ वाघ आणि चालक नामदेव केदार याचा जागीच मृत्यू झाला.

माळशेज घाट रस्त्यावर मोठे खडक पडल्याने हे खडक फोडून रस्ता साफ करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. मात्र घाटात मुसळधार पाऊस आणि दाट धुके असल्यामुळे काम करण्यास अनेक अडथळे आलेत. हा घाट दुहेरी वाहतुकीसाठी दोन दिवसानंतर सुरू होण्याची शक्यता आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अहमनगरहून माळशेज घाटामार्गे मुंबईकडे येणाऱ्या वाहनांना शहापूर-मुरबाड मार्गावरून प्रवास करावा. तसेच मुंबईहून कल्याणमार्गे माळशेज घाटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना पनवेलमार्गे अहमदनगरकडे जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.