महिला कंडक्टर आणि प्रवासी महिलेचे कपडे फाडले

कल्याणहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बस मध्ये क्षुल्लक वादातून एका प्रवाशाने महिला कंडक्टरला मारहाण केल्याची घटना घडली. इतकेच नव्हे सदर पीडीत महिलेची मदत करण्यास गेलेल्या दुसऱ्या महिला कंडक्टरलाला या माथेफिरू प्रवाशाने बेदम मारहाण केली.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 4, 2014, 09:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कल्याण
कल्याणहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बस मध्ये क्षुल्लक वादातून एका प्रवाशाने महिला कंडक्टरला मारहाण केल्याची घटना घडली. इतकेच नव्हे सदर पीडीत महिलेची मदत करण्यास गेलेल्या दुसऱ्या महिला कंडक्टरलाला या माथेफिरू प्रवाशाने बेदम मारहाण केली.
या मारहाणीत या महिलांचे कपडे ही फाटले. ही घटना घडत असताना एका ही प्रवाशाने या माथेफिरू प्रवाशाला प्रतिकार करण्याची तसदी न घेता बघ्याची भूमिका घेणे पसंत केले. सुशिक्षित आणि सुसंकृत असलेल्या डोंबिवलीकरांची बघ्याची भूमिका लाजिरवाणी असल्याचे बोलले जात आहे.
बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कल्याण पनवेल ही बस कल्याण एसटी आगारातून पनवेलच्या दिशेने जाण्यास निघाली. ही बस डोंबिवली जवळील सोनारपाडा येथे पोहोचताच एका तरुणाने बसच्या पुढील दरवाजाने आत येण्याचा प्रयत्न केला. मात्र बस चालकाने त्याला विरोध केला असता या तरुणाने या वृद्ध चालकाशी वाद घालत शिव्या देण्यास सुरुवात केली. या प्रकार पाहून बसमधील महिला कंडक्टर दीपमाला सोनावणे याने या तरुणाला समजवण्याचा प्रयत्न केला असता सदर तरुणाने महिला कंडक्टर दीपमाला सोनावने यांना धक्काबुक्की करत मारहाण केली या मारहाणीत सोनावणे यांचे कपडे फाटले. हा प्रकार पाहून मागील बाजूने येणाऱ्या बसमधील सोनाली पाटील या महिला कंडक्टरने या तरुणाला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र या तरुणाने सोनाली पाटील यांना ही मारहाण केली. अखेर या दोन महिला कंडक्टरला भर रस्त्यात मारहाण करणाऱ्या या तरुणाला काही जणांनी पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे या तरुणाचे नाव अभिषेक सिंग आहे.
सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट ही कि या बस प्रवाशांनी भरल्या होत्या मात्र ही घटना घडत असताना एकही प्रवाशाने किंवा एका ही नागरिकाने प्रतिकार करण्याचे औस्तुक्य दाखवले नाही. या दोन महिला कंडक्टरला भर रस्त्यात मारहाण करणाऱ्या या तरुणाला थांबवण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतली याबाबत महिला कंडक्टरने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.