HDFC आणि BOI सह अनेक बँकांनी घटविले व्याजदर

 एचडीएफसीसह आणखी काही बँका आणि गृहकर्ज कंपन्यांनी आज आपल्या उधारी दरात ०.९ टक्क्यांनी घट केली आहे. त्यामुळे गृहकर्ज आणि व्यावसायिक कर्ज स्वस्त होणार आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 4, 2017, 08:51 PM IST
HDFC आणि  BOI सह  अनेक बँकांनी घटविले व्याजदर  title=

मुंबई :  एचडीएफसीसह आणखी काही बँका आणि गृहकर्ज कंपन्यांनी आज आपल्या उधारी दरात ०.९ टक्क्यांनी घट केली आहे. त्यामुळे गृहकर्ज आणि व्यावसायिक कर्ज स्वस्त होणार आहे. 

या बँकांमध्ये कॉरपोरेशन बँक, बँक ऑफ इंडिया, पंजाब अँड सिंध बँकेने एमसीएलआर दरात कपात केली आहे.  तसेच एचडीएफसी लिमिटेड आणि इंडिया बुल्सने आपल्या व्याज दरात ०.४५ टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. 

एचडीएफसीने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ७५ लाखपर्यंत गृहकर्जात ८.७ टक्के   व्याज लागणार आहे. महिला अर्जदारांना यात आणखी ०.०५ टक्के सूट देण्यात आली. आतापर्यंत एचडीएफसी बेंचमार्क कर्जाचा दर ९.१ टक्के होता. नवे दर तात्काळ प्रभावाने लागू होणार आहेत. 

दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील बँक  असलेल्या बँक ऑफ इंडिया ने ही आपल्या व्याजदरात कपात केली आहे. बेंचमार्क कर्ज दरात ०.९ टक्के घट केली आहे. एक वर्षाचा एमसीएलआर दरात ०.७५ टक्के कपात करून ८.५० टक्के करण्यात आले आहे. तसेच एक दिवसाच्या एमसीएलआरला ०.९ टक्के घटवून ८.१ टक्के करण्यात आले आहे. नवे दर ७ जानेवारीपासून लागू होणार आहे. 

पंजाब अंड सिंध बँकेने एका वर्षांच्या एमसीएलआरला ०.८ टक्क्याने घटवून ८.७५ टक्के करण्यात आली आहे. या संदर्भात बँकेने आधार दर किंवा न्यूनतम उधारी दरात ०.०५ टक्के घट करून ९.७० टक्के करण्यात आले आहे. नवा दर उद्यापासून लागू होणार आहे. 

कॉर्पोरेशन बँकेने एक वर्षाच्या एमसीएलआर दरात ०.७ टक्के घटवून ८.७५ टक्के करण्यात आला आहे.