www.24taas.com, झी मीडिया, राळेगण सिद्धी
दिल्लीत काँग्रेसची जोरदार पिछेहाट झालीय. नवी दिल्लीत गेल्या १५ वर्षांची काँग्रेसची सत्ता संपुष्टात येणार हे स्पष्ट झालंय. यावरच टीका करत लोकांचा विश्वासघात करणाऱ्या काँग्रेसचा पराभव भ्रष्टाचारामुळेच झाला, असं अण्णा हजारी यांनी म्हटलंय.
अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत पहिल्याच धडाक्यात जोरदार मुसंडी मारलीय. अरविंद केजरीवाल आणि शीला दीक्षित एकमेकांसमोर उभे ठाकले होते. मतमोजणीत पहिल्यापासूनच शीला दीक्षित पिछाडीवर राहिलेल्या दिसल्या.
जुन्या पैशावाले पक्षांना मागे टाकत अरविंद केजरीवाल यांनी आघाडी घेतल्यानं मला आनंदच झालाय, असं अण्णांनी म्हटलंय. ते राळेगणसिद्धिमध्ये बोलत होते. ‘जनतेचा विश्वासघात करणाऱ्या काँग्रेसला जनतेनंच ही सजा दिलीय. राजकीय पक्ष सक्षम कायदे बनविण्यात असमर्थ ठरलेत. यांना जनता लोकसभा निवडणुकीतही चांगलाच धडा शिकवणार आहे’ असं अण्णांनी म्हटलंय. यावेळी ‘एक ना एक दिवस केजरीवालही मुख्यमंत्री बनतील’ असंही अण्णांनी म्हटलंय.
गरज पडल्यास मी देशाची भ्रमंती करेन पण कोणत्याही पक्षाचा प्रचार करणार नाही, असंही अण्णांनी यावेळी म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.