www.24taas.com, झी मीडिया, लंडन
सकाळी उठल्यानंतर फ्रेश होण्यासाठी आणि स्वत:ला मेन्टेन करण्यासाठी तुम्ही अनेक उपाय केले असतील... तुम्ही तुमच्या आरोग्याबाबतीत दक्ष असाल तर दिवसातून एक ग्लास फळांचा ज्यूस नक्कीच घ्या...
फळं ही तुमच्या आवडती गोष्ट असेल तर खुपच छान... दिवसभरातून तुम्ही एक ग्लास तरी तुम्हाला आवडत्या फळांचा ज्युस घ्यायलाच हवा... कारण, यामध्ये शर्करेचं प्रमाण अधिक असतं. ब्रिटिश सरकारच्या ‘राष्ट्रीय भोजन तसंच पोषण आहार सर्वेक्षण’मध्ये हे स्पष्ट करण्यात आलंय.
ब्रिटिश सरकारच्या एजन्सीद्वारे केल्या गेलेल्या सर्वेक्षणात हे स्पष्ट करण्यात आलंय. अभ्यासकांच्या मते, 11 ते 19 वर्षांच्या युवकांच्या आहारात जवळपास 47 टक्के सेवन फळांचा ज्युस, थंड पेय, बिस्किट आणि केक या पदार्थांचं असायला हवं. या पदार्थांत थर्करेचं प्रमाण अधिक असतं.
केवळ 10 टक्के किशोरवयीन मुलं आणि 7 टक्के किशोरवयीन मुलींना फळं आणि भाज्यांचा पाचवा हिस्सा मिळतो, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलंय. 10 वर्षांपर्यंतच्या मुलांना केवळ 34 टक्के शर्करा मिळायला हवा, असंही या सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आलंय. सर्व्हेमध्ये 2008 ते 2012 या दरम्यान 4000 वयस्कर व्यक्तींवर आणि मुलांवर हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.