‘व्हीटॅमिन डी’ घेते महिलांच्या आरोग्याची काळजी

महिलांचे आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी ‘व्हीटॅमिन डी’ एक उत्तम गुणकारीक औषध आहे. हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. तसा दावा अभ्यासकर्त्यांनी केला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 5, 2012, 02:23 PM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन
महिलांचे आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी ‘व्हीटॅमिन डी’ एक उत्तम गुणकारीक औषध आहे. हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. तसा दावा अभ्यासकर्त्यांनी केला आहे.

महिलांसाठी अल्जायमर म्हणजेच स्मृतीभ्रंशचा अधिक धोका असतो. तसेच महिलांचे आरोग्य चांगले राहावे आणि मानसिक स्वास्थ्य़ व्यवस्थित राहण्यासाठी ‘व्हीटॅमिन डी’ची मात्रा लागू पडते. त्यामुळे महिलांनी ‘व्हीटॅमिन डी’ला अधिक पसंती देण्याची गरज आहे.
अमेरिका आणि फ्रान्समधील अभ्यासकर्त्यांनी महिलांच्या मानिसक आजारावर अभ्यास केला. त्यानंतर ‘व्हीटॅमिन डी’ची मात्रा अधिक उपयुक्त पडते, हे सिद्ध केले. ज्या महिलांना स्मृतीभ्रंशचा धोका आहे. त्या महिला या आजारातून बाहेर पडू शकतात किंवा त्यांना तो होण्याचा धोका कमी होता.
मिनियापोलीस (Minneapolis Medical Center) येथील एका मेडिकल सेंटरच्या येलेना स्लीनीन यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या आजाराबाबत संशोधन करण्यात आले. या अभ्यासाच्यावेळी स्मृतीभ्रंश असणाऱ्या महिलांमध्ये ‘व्हीटॅमिन डी’ची मात्रा देण्यात आली. त्यावेळी कमी प्रमाणात डी व्हीटॅमिन असणाऱ्या महिलांना याचा लाभ झाला. त्यांच्यातील असणारा आजार कमी होण्यास मदत झाली.
‘व्हीटॅमिन डी’ची कमी असणाऱ्या ६२५७ वृद्ध महिलांचा अभ्यास करण्यासाठी निवड करण्यात आली. तर फ्रान्समध्ये सेड्रीक एनवीलकर यांच्या नेतृत्वाखाली ४९८ महिलांचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर महिलांच्या आजाराचा निष्कर्ष काढण्यात आला. या निष्कर्षात ‘व्हीटॅमिन डी’ची मात्रा लागू पडल्याचे दिसून आले.

संशोधन करणाऱ्यांनी स्मृतीभ्रंश असणाऱ्या महिलांना ‘व्हीटॅमिन डी’ची मात्रा आठवड्याला ५०.३ मायक्रोग्रॅम पेक्षा कमी आहार घेणाऱ्यांमध्ये आजाराचे प्रमाण दिसून आले. त्या महिला या आजाराने पिढीत होत्या. तसेच ५९ मायक्रोग्रॅम पेक्षा ‘व्हीटॅमिन डी’ घेत होती. तर अभ्यासकांच्या मते जेवणाव्यतीरिक्त जे ‘व्हीटॅमिन डी’ घेत नाहीत. त्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता कमी असते. यात पुरूषही मागे नाहीत. तेही कमी सक्रीय असतात.