वृश्चिक - नवीन वर्षे रोमांचक क्षणांचे

२०१२ हे वर्ष तुमच्यासाठी उर्जा आणि रोमांच आणणारे असणार आहे. तुमच्यात पूर्ण वर्षात एक सकारात्मक दृष्टीकोन असणार आहे. बदलत्या परिस्थितीनुसार तुमच्या जीवनात काही नवीन रोमांचक क्षण येतील. त्या क्षणांना आपलंसं करा आणि त्याचा भरपूर आनंद घ्या.

Updated: Jan 4, 2012, 06:23 PM IST

२०१२ हे वर्ष तुमच्यासाठी उर्जा आणि रोमांच आणणारे असणार आहे. तुमच्यात पूर्ण वर्षात एक सकारात्मक दृष्टीकोन असणार आहे. बदलत्या परिस्थितीनुसार तुमच्या जीवनात काही नवीन रोमांचक क्षण येतील. त्या क्षणांना आपलंसं करा आणि त्याचा भरपूर आनंद घ्या. तुम्ही इतरांच्या प्रति दयाळू आणि सामंजस्यपणा दाखवाल. तुम्ही शांतचित्त असल्याने तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने हे फार फायदेशीर आहे.

वर्षाचे पहिले तीन महिने अनुकूल आणि सक्रीय असणार आहे. तुमच्या मानसिक क्षमतांची विशेष दखल घेतली जाईल. तुमच्या क्रिएटिविटीला वाव आहे. या काळात कुटुंब, मित्र आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या व्यक्तीसाठी तुम्ही ज्ञानाचे केंद्र म्हणून पुढे याल. तुम्ही या काळात तुमच्या करिअरमध्ये स्थीर व्हाल आणि तुमच्या प्रगतीचा आलेख हा वर जाणारा असेल.

तुमच्या जीवनात ऑगस्ट महिन्यात मोठ्या हालचाली होतील. यानंतर तुम्ही तुमच्या जीवनात नवीन योजनांमध्ये जास्तीत जास्त आउटपूट द्याल. या काळात करीअरमध्ये वरची पोस्ट मिळेल आणि धनलाभ होण्याची शक्यता आहे.  हा काळ तुमच्या आयुष्यात नोव्हेंबर महिन्यापर्यंत असणार आहे. या वर्षात तुम्ही सामाजिक लोकप्रियता प्राप्त कराल. मस्सरापासून दूर राहा. तसेच मधूर संबंध वाढविण्यावर भर द्या. सुडाच्या भावनेने काम करून नका हे तुमच्यासाठी धोकादायक होऊ शकते.  आशावादी आणि खुल्या विचारांच्या व्यक्ती तुम्हांला आपलंसं करतील.

तुमच्यातील उत्साह हा कुटुंबात सुखशांती आणेल. काही वित्तीय समस्यांना दूर करण्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागतील. व्यापारात भागीदारीसंदर्भात मे आणि नोव्हेंबर महिन्यात काही अडचणी येऊ शकतात.

Tags: