आजच्या दिवशी तुम्हांला जवळच्या आणि दूरच्या व्यक्ती ‘व्हॅलेंटाईन डे’च्या शुभेच्छा देतील. प्रेमी युगलांसाठी आजचा दिवस एकमेकांच्या जवळ येण्याचा खास असा आहे, पण आज तुम्हांला काही प्रमाणात विरह देखील सहन करावा लागेल.
तसचं तुमचं आजचं भेटणं अत्यंत गुप्त राहील यांची काळजी घ्या.
तूळ राशी असणारे पुरूष आज काही काळाकरता तुम्हांला जास्त आकर्षक वाटू लागतील. पण आज प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडेलच असे नाही. पण आज खूप साऱ्या व्हॅलेटाईन शुभेच्छांचा वर्षाव होईल.