लावाचा स्मार्टफोन दहा भारतीय भाषेत

लावा आयरिस 402e स्मार्टफोन भारतात लॉन्च झालाय. कंपनीच्या वेबसाईटवर याची किंमत 4999 रुपये तर ऑनलाईन शॉपिगं साईटवर हाच फोन 4199 रुपये मिळत आहे. 

Updated: Jul 5, 2014, 12:54 PM IST
लावाचा स्मार्टफोन दहा भारतीय भाषेत  title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : लावा आयरिस 402e स्मार्टफोन भारतात लॉन्च झालाय. कंपनीच्या वेबसाईटवर याची किंमत 4999 रुपये तर ऑनलाईन शॉपिगं साईटवर हाच फोन 4199 रुपये मिळत आहे. 

लावा आयरिस 402e मध्ये इंग्रजीसोबत 10 भारतीय भाषांचा समावेश आहे.  हिंदी, तेलगू, मराठी, तमिळ, गुजराती, कन्नड, ओडिशा,पंजाबी, आसामी आणि बंगाली या भाषा फोनमध्ये उपलब्ध आहेत. 

काही आठवड्यांपूर्वी 21 भाषा असलेला मायक्रोमॅक्स यूनाइट आणि मायक्रोमॅक्स यूनाइट 2 बाजारात आलाय. 

वैशिष्ट्य
ड्यूल सिम 
4.2.1 अॅन्ड्रॉईड जेली बीन
4 इंच डिस्प्ले 
1 गीगाहार्टज ड्यूअल कोर प्रोसेसर 
512 एमबी रॅम
3 मेगापिक्सेल कॅमरा 
0.3 मेगापिक्सेल फ्रंन्ट कॅमरा 
512 एमबी इंटरनल स्टोरेज असून 32 जीबीपर्यंत मायक्रो- एसडी कार्ड लावू शकतो. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.