मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि अनेकांना धक्का बसला. मोदींनी काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक केल्याचं म्हणत अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं. त्यानंतर आता ५०० आणि २००० च्या नोटा व्यवहारात येणार आहेत. नवीन नोटांबाबत अनेकांमध्ये उत्सूकता आहे.
२००० च्या नोटांमध्ये एक चिप असल्याने २ दिवसांपासून २००० ची नोट कोठेही ठेवली किंवा लपवली तरी ती सॅटेलाईटच्या माध्यमातून शोधता येणार आहे, अशी सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. यानंतर एक २००० ची नोट व्हायरल होते आहे. जी फाटलेल्या अवस्थेत दिसत आहे. नवीन नोट कोणी का फाडली असेल याबाबत तुम्हाला आश्चर्य वाटत असेल पण खरंच या नोटेमध्ये चिप आहे का हे पाहण्यासाठी नोट फाडल्याचं म्हटलं जातंय.
पण ही फाटलेली नोट एडिटींग करुन बनवण्यात आली आहे ? या मागचं सत्य अजून समोर आलेलं नाही. नोटमध्ये कोणतीही चीप नाही असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देखील स्पष्ट केलं आहे. ही नोट सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होते आहे.