मुंबई: येत्या काही महिन्यांमध्ये जर तुम्ही सॅमसंगचा प्रिमियम स्मार्ट फोन घेणार असाल तर कंपनीनं तुम्हाला एक खुशखबर दिली आहे. सॅमसंगच्या येणाऱ्या आगामी प्रिमियम स्मार्ट फोनमध्ये 256 जीबीची इंटरनल मेमरी असणार आहे.
बार्सिलोनामध्ये सुरु असलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये कंपनीनं ही घोषणा केली आहे. याबरोबरच या फोन्सची रिडींग स्पीड 850 mbps असेल, तसंच 260 mbpsच्या स्पीडनं या फोनमध्ये डेटा लोड होईल.