लग्नानंतरच समोर येतात या पाच गोष्टी!

लग्नाबाबत नेहमी असं बोललं जातं. 'लग्न हा एक असा लाडू आहे जो खाणारा पस्तावतो आणि न खाणाराही...' जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्यांकडे बघून निष्कर्ष काढत असतो.

Updated: Nov 8, 2015, 06:30 PM IST
लग्नानंतरच समोर येतात या पाच गोष्टी! title=

मुंबई: लग्नाबाबत नेहमी असं बोललं जातं. 'लग्न हा एक असा लाडू आहे जो खाणारा पस्तावतो आणि न खाणाराही...' जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्यांकडे बघून निष्कर्ष काढत असतो.

आणखी वाचा - महिलांच्या या समस्या पुरूष कधीच समजू शकत नाहीत

कधी हे नातं चांगलं वाटतं तर कधी एक बंधन वाटतं. पण एकाचा अनुभव दुसऱ्यासाठीही तसाच ठरेल असं नाही. प्रत्येक नात्यात चढ-उतार सुरूच असतो. पण लग्नासारखं नातं टिकविण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते पती-पत्नी समजुतदारपणे काम करेल आणि मिळून प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल.

आणखी वाचा - आपल्या पार्टनरला हे पाच प्रश्न विचारा

लग्नानंतर अनेक गोष्टी बदलतात. असे काही बदल असतात ज्याबद्दल आपल्याला कुणी समजावू शकत नाहीत आणि ना ही त्यापासून बाहेर पडण्याचा उपाय कुणी सांगू शकतं. 

या पाच गोष्टींचा अनुभव लग्नानंतरच येतो

1. जर आपण एकटे आहात तर लग्न आपल्या आयुष्यातील ही कमतरता भरून काढण्यात काही प्रमाणात तरी यशस्वी ठरेल. पण लग्न करणं प्रत्येक समस्येवरील उपाय नाही. आयुष्यातील अनेक समस्या दूर करण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील.

2. लग्न दोघांना जोडण्याचं काम करतं. मात्र लग्नानंतर प्रत्येकवेळी आपल्या पार्टनरसोबत राहणं, त्याला एकटं कुठेही जावू न देणं, ना स्वत: एकटं जाणं हे साफ चुकीचं आहे. प्रत्येकवेळी आपल्या जोडीदारासोबत राहिल्यानं प्रेम वाढतं, हा विचार बरोबर नाही. यामुळं आपला पार्टनर इरिटेड होऊ शकतो.

3. लग्नाच्या दिवशी नवरी-नवरदेव दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असतं. लग्नानंतर मात्र हे चित्र बदलतं. इतर कामं आणि जबाबदाऱ्यांमुळे पती-पत्नी दोघंही स्वत:ला विशेष लक्ष ठेवू शकत नाही. याचा अर्थ असा नाही की, ते आकर्षक दिसत नाहीत. पण दोघांमधील हा बदल त्यांनी स्वीकारायला हवा.

4. लग्नाच्या वेळी अनेक शपथा खाल्ल्या जातात, वचनं दिली जातात. आपल्यात नेहमी प्रेम राहिल असं म्हटलं जातं. पण खरं तर लग्नानंतर अनेक जोड्यांच्या नात्यांमध्ये बदल होतो. याबाबतही आपण तयार असलं पाहिजे.

5. लग्नाच्या दिवशी कुणीही हा विचार करत नसेल की, आपल्या पार्टनरचा आपल्याला कधी खूप राग येईल. पण लग्नाच्या काही वर्षांनंतर कधी-कधी कोणता वाद इतका वाढतो की, मनात आपण लग्न करायला नको होतं, हा विचार येऊन जातो. 

आणखी वाचा - लग्नानंतर लगेच चुकूनही या गोष्टी करू नका...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.