विद्यार्थांनो, आता पदवी पाच वर्षातच पूर्ण करण्याचा नियम

पदवी परीक्षेसाठी आता विद्यापीठ अनुदान आयोगाने काही मर्यादा घालून दिल्यात. विद्यार्थ्याना पाच वर्षातच पदवी पूर्ण करता येणार आहे. याबाबतचं पत्र विद्यापीठ अनुदान आयोगानं देशातल्या सर्व विद्यापीठांना पाठवलंय.

Updated: Oct 23, 2015, 07:15 PM IST
विद्यार्थांनो, आता पदवी पाच वर्षातच पूर्ण करण्याचा नियम title=

मुंबई : पदवी परीक्षेसाठी आता विद्यापीठ अनुदान आयोगाने काही मर्यादा घालून दिल्यात. विद्यार्थ्याना पाच वर्षातच पदवी पूर्ण करता येणार आहे. याबाबतचं पत्र विद्यापीठ अनुदान आयोगानं देशातल्या सर्व विद्यापीठांना पाठवलंय.

पदवीसाठीच्या पहिल्या परीक्षेत तुम्ही नापास झालात तर पुढील दोन वर्षातच तुम्हाला पदवी परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. 

तसंच तुम्ही पदवीच्या पहिल्या वर्षी प्रवेश घेतला तर पाच वर्षात तुम्हाला पदवी पूर्ण करता येईल, असा नियमच आता युजीसीने लागू केलाय.... याविषयी युजीसीचे माजी अध्यक्ष अरूण निगवेकर यांनी काही वेळापूर्वी फोनवरून दिलेली प्रतिक्रिया. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.