मुंबई : गूगल प्ले स्टोअसवर बॅंकिंग संदर्भात उपलब्ध असलेली अॅप डाऊनलोड केल्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. या बॅंकिंग अॅपचा वापर केल्यामुळे त्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली. २२ ग्राहकांनी बॅंकिंग अॅपचा वापर केला. मात्र, ही बनावट अॅप होती, हे बॅंक खाती खाली झाल्यानंतर लक्षात आले.
दरम्यान, रिझर्व्ह बॅंकेने कित्येक महिन्यापूर्वी बनावट अॅपपासून सावधान राहा, असे सांगितले होते. एसबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले, गूगर प्ले स्टोअरवर अनेक बॅंकिंग संदर्भात बनावट अॅप आहेत. ही अॅप बॅंक स्टेटमेंट, बॅलन्सबाबत माहिती देत आहेत. मात्र, अशी अॅप बॅंकेची नाहीत.
मात्र, बॅंकेची नक्कल करुन ही अॅप्स बनविण्यात आली आहेत. अशा अॅपचा वापर करणाऱ्यांची सर्व माहिती त्यांना मिळते. त्यातून बॅंकेत किती रक्कम शिल्लक आहे. याची माहिती संबंधितांना बॅंकेकडे आल्यावर मिळते. त्यामुळे बॅंकेचे अधिकृत अॅप वापरण्याचा सल्ला बॅंक अधिकारी देत आहेत.
ई-मेल आणि डेबिट-क्रेडिट कार्ड नकली बनवून तुमच्या खात्याची माहिती मिळवून फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे अशा गूगल प्ले स्टोअरवरील बॅंकिंग संदर्भातील बनावट अॅपपासून सावध राहणे योग्य तसेच अशी अॅप्स डाऊनलोड न करणे उत्तम.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.