एअरटेल, आयडियानं पोस्ट पेड ग्राहकांना दिला झटका, डाटा प्लान महागला

भारती एअरटेल आणि आयडिया सेल्युलरनं दिल्लीत प्रीपेड ग्राहकांसाठी डाटा चार्जमधील दरवाढीनंतर आता पोस्ट पेड ग्राहकांवरही महागाईची कुऱ्हाड टाकलीय. आयडिया, एअरटेलनं डाटा प्लानमध्ये २० टक्क्यांनी वाढ केलीय. देशाची राजधानी दिल्लीतही ही दरवाढ लागू झालीय.

Updated: Aug 30, 2015, 03:31 PM IST
एअरटेल, आयडियानं पोस्ट पेड ग्राहकांना दिला झटका, डाटा प्लान महागला  title=

नवी दिल्ली: भारती एअरटेल आणि आयडिया सेल्युलरनं दिल्लीत प्रीपेड ग्राहकांसाठी डाटा चार्जमधील दरवाढीनंतर आता पोस्ट पेड ग्राहकांवरही महागाईची कुऱ्हाड टाकलीय. आयडिया, एअरटेलनं डाटा प्लानमध्ये २० टक्क्यांनी वाढ केलीय. देशाची राजधानी दिल्लीतही ही दरवाढ लागू झालीय.

प्री पेड आधीच महागला

काही महिन्यांपूर्वी पहिले तीन मुख्य ऑपरेटर एअरटेल, आयडिया आणि वोडाफोनं दिल्लीत २जी आणि ३जीच्या प्रीपेड दरांमध्ये ४७ टक्क्यांनी वाढ केली. अद्याप वोडाफोननं दिल्ली आणि इतर सर्कलमध्ये आपल्या पोस्ट पेड सेवेच्या डाटा प्लानच्या दरात वाढ केली नाही.

आणखी वाचा - व्होडाफोनची 4G सेवा या वर्षाच्या अखेरीस

इथं लागू झाली वाढ

कंपनीनं वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार एअरटेलनं दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश पूर्व आणि उत्तर प्रदेश पश्चिम सर्कलमध्ये डाटाच्या दरात वाढ झालीय. तर आयडिया सेल्युलरनं दिल्ली, पंजाब आणि पश्चिमी उत्तर प्रदेशमध्ये डाटाचे दर वाढवले. या दोन कंपन्यांच्या पोस्ट पेड ग्राहकांना आता १ जीबीच्या ३जी डाटासाठी ३०० रुपये खर्च करावा लागेल. आता हे दर २५० रुपये आहेत.

आणखी वाचा - व्हॉट्स अॅपमधील हा नवा बदल तुम्ही पाहिला!

वोडाफोननं अजून वाढवले नाहीत दर 

वोडाफोननं अजून दिल्ली सर्कलमध्ये १जीबी ३जी डाटासाठी २५० रुपयेच दर घेत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.