पुढील वर्षी महिलांसाठी ट्विटरमध्ये नोकरीची संधी

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर २०१६ साली आपलं टार्गेट ठरवत विविध पदांवर महिलांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. एका ट्विटर ब्लॉगवर वेगवेगळ्या टार्गेटची यादी त्यांनी शेअर केलीय.

Updated: Aug 30, 2015, 11:47 AM IST
पुढील वर्षी महिलांसाठी ट्विटरमध्ये नोकरीची संधी title=

मुंबई: मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर २०१६ साली आपलं टार्गेट ठरवत विविध पदांवर महिलांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. एका ट्विटर ब्लॉगवर वेगवेगळ्या टार्गेटची यादी त्यांनी शेअर केलीय.

आणखी वाचा - किबोर्ड... फोल्ड करा... आणि सहजच कुठेही कॅरी करा! 

या यादीनुसार, लिंगभेद टाळण्यासाठी ३५ टक्के महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ट्विटरचे सद्यस्थितीत जगभरात ४,१०० कर्मचारी आहेत आणि त्यातील तांत्रिक नोकरीच्या जागा पाहून महिलांसाठी १६ टक्के जागा वाढविण्याची योजना आहे.

ब्लॉग पोस्टद्वारे दिली माहिती

एका ब्लॉग पोस्टमध्ये जेनेट वॉन ह्युसे यांनी सांगितलं, आमची कंपनी विविध स्तरांवर टार्गेटनुसार काम करतो. मला आनंद होतोय की आमची कंपनी मोठी होतेय.

आणखी वाचा -  ६ मिनीटांत करा स्मार्टफोन फुल्ल चार्ज, सोबत मिळवा ७ दिवसांचा बॅकअप

महिला आणि अल्पसंख्यांकासाठी विशेष योजना

जेनेट यांनी सांगितलं की म्हणून आम्ही लक्ष्यपूर्तीसाठी महिला आणि अल्पसंख्यांकामधील प्रतिनिधित्व वाढविण्यावर भर देतोय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.