नवी दिल्ली: दिल्लीसह संपूर्ण देशामध्ये महिला स्वत:ला असुरक्षित समजतात. दररोज बलात्काराच्या घटना घडत असतात. कुठे ३ महिन्यांच्या नवजात मुलीवर तर कुठे ९० वर्षाच्या वृद्धेवर, नराधमांना आता काहीच उरलं नाही.
जेव्हा व्यक्तीच्या नजरेतील पाणी संपतं, तेव्हा कदाचित कायद्याचं आणि समाजाचं भय त्याच्या मनातून संपून जातं. बलात्कार केल्यानंतर स्वत:ला कामदेव समजणाऱ्या या नराधमांमधील माणूसपण कधीचंच मेलंय. बस, ट्रेन एवढंच नव्हे तर फ्लाइटमध्येही हे नराधम महिलांना सोडत नाहीत आणि हा समाज! या समाजातील लोक सर्व पाहून गप्प बसतात.
समाजातील अशा नराधमांना त्यांच्या कृत्याबाबत सांगण्यासाठी आणि झोपलेल्या समाजाला जागृत करण्यासाठी माधुरी देसाई नावाच्या तरूणीनं एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकलाय. या व्हिडिओमध्ये तरुणीनं उपहासात्मकरित्या बलात्कार करणाऱ्या नराधमांना सुनावलंय.
पाहा व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.