लॉन्चपूर्वी लीक झाले iPhone 6चे फोटो

अॅपल आज जगभरात आपला नवा हँडसेट iPhone 6 लॉन्च करणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे दहा वाजता याची पहिली झलक आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण लॉन्चपूर्वी त्याचे काही फोटो लीक झाले आहेत.

Updated: Sep 9, 2014, 04:52 PM IST
लॉन्चपूर्वी लीक झाले iPhone 6चे फोटो

न्यू यॉर्क : अॅपल आज जगभरात आपला नवा हँडसेट iPhone 6 लॉन्च करणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे दहा वाजता याची पहिली झलक आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण लॉन्चपूर्वी त्याचे काही फोटो लीक झाले आहेत.

आता एक कयास लावला जात आहे की अॅपल दोन प्रकारचे हँडसेट लॉन्च करणार आहे. ज्याचा स्क्रिनचा आकार पहिल्या पेक्षा मोठा आहे. अॅपलच्या नव्या फोनचा आकार 4.7 इंच x 5.5 इंच असणार आहे. हा हँडसेट अॅपलच्या नव्या ऑपरेटिंग सिस्टम आयओएस 8 वर चालणार आहे.

या फोनचा रिअर कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आणि फ्रंट कॅमेरा २.१ मेगापिक्सलचा आहे. फोनची वॉटरप्रुफ केसिंग असणार आहे. याची इंटरनल मेमरी १२८ जीबी असणार आहे.

या फोनची तुम्ही आतुरतेने वाट पाहत असाल तर त्यापूर्वी लीक झालेले फोटो पाहा....

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.