फेसबुकवर सक्रिय आहात... आपलं नातं जपा!

सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर अधिक सक्रिय राहणाऱ्यांमध्ये नात्यांबाबत असुरक्षिततेची भावना असते, असं एका संशोधनातून पुढे आलंय. लोकांचं लक्ष आकर्षित करण्याच्या उद्देशानं ते आपल्या वॉल अर्थात भिंतीवर सातत्यानं टिप्पणी करीत असतात. तसंच असे लोक दुसऱ्यांच्या ‘पोस्ट’ला लाईक करणं आणि आपले स्टेटस सतत बदल असतात.

Updated: Feb 16, 2015, 07:57 AM IST
फेसबुकवर सक्रिय आहात... आपलं नातं जपा! title=

न्यू यॉर्क: सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर अधिक सक्रिय राहणाऱ्यांमध्ये नात्यांबाबत असुरक्षिततेची भावना असते, असं एका संशोधनातून पुढे आलंय. लोकांचं लक्ष आकर्षित करण्याच्या उद्देशानं ते आपल्या वॉल अर्थात भिंतीवर सातत्यानं टिप्पणी करीत असतात. तसंच असे लोक दुसऱ्यांच्या ‘पोस्ट’ला लाईक करणं आणि आपले स्टेटस सतत बदल असतात.

अमेरिकी युनियन कॉलेजच्या एका संशोधन गटानं यासंदर्भात अभ्यास केला आहे. यात १८ ते ८३ या वयोगटातील सुमारे ६०० लोकांनी सहभाग घेतला. यातील सहभागींना दोन सर्वेक्षणांच्या माध्यमातून नजीकचे नातेवाईक आणि फेसबुकवरील त्यांच्या सवयींबाबत विचारणा करण्यात आली.

संशोधनात लक्षात आलं की, फेसबुकवर सक्रिय राहणाऱ्यांत मुख्यत: दोन प्रकारचे लोक आहेत. एक, लोकांप्रती अधिक बांधिलकीची भावना असलेले आणि दोन, स्वत:चं मत अधिक ठामपणे मांडण्याची इच्छा असलेले. मात्र फेसबुकवरील अधिक सक्रिय असणाऱ्यांनी आपल्या नात्याबद्दल विशेष गंभीर असण्याची गरज आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.