दमदार बॅटरीसह आसूसचा 'झेनफोन मॅक्स' लॉन्च

तैवानची टेक्नॉलॉजी कंपनी आसूसनं सोमवारी भारतात आपला फोर जी सपोर्टिव्ह 'एनेबल्ड झेनफोन मॅक्स' (झेनफोन मॅक्स) हा स्मार्टफोन लॉन्च केलाय. 

Updated: Jan 5, 2016, 09:41 AM IST
दमदार बॅटरीसह आसूसचा 'झेनफोन मॅक्स' लॉन्च title=

मुंबई : तैवानची टेक्नॉलॉजी कंपनी आसूसनं सोमवारी भारतात आपला फोर जी सपोर्टिव्ह 'एनेबल्ड झेनफोन मॅक्स' (झेनफोन मॅक्स) हा स्मार्टफोन लॉन्च केलाय. 

यामध्ये ५००० एमएएच बॅटरीचा वापर करण्यात आलाय. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनची प्रीबुकिंग ई-कॉमर्स वेबसाईट अमेझॉन डॉट इन आणि फ्लिपकार्ट डॉट कॉमवर सोमवारी दुपारपासून सुरू झालीय. 

उल्लेखनीय म्हणजे, या स्मार्टफोनची लीथियम - पॉलीमर बॅटरी ३७.६ तास थ्रीजी टॉक टाईम, ३२.५ तास वाय-फाय वेब ब्राऊजिंग आणि ७२.९ तास प्ले बॅक म्युझिक किंवा २२.६ तास व्हिडिओ प्लेबॅकसाठी सक्षम आहे. 

'झेनफोन मॅक्स'चे फिचर्स...  
रिअर कॅमेरा - १३ मेगापिक्सल
फ्रंट कॅमेरा - ५ मेगापिक्सल
प्रोसेसर - क्वॉलकॉम ८९१६ (स्नॅपड्रॅगन ४१०) क्वॉड कोर
रॅम - २ जीबी
इंटरनल मेमरी - १६ जीबी (एसडी कार्डच्या साहाय्यानं ६४ जीबी पर्यंत वाढवता येता)
चेसिस - ५.२ मिलीमीटर

जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून हा स्मार्टफोन स्टोअर्समध्येही मिळू शकेल. भारतात या स्मार्टफोनची किंमत आहे ९९९९ रुपये.