'ब्लॅकबेरी लीप'... एकाच सीममध्ये वापरा तब्बल नऊ क्रमांक!

स्मार्टफोन उत्पादक कंपनी 'ब्लॅकबेरी'नं आपली विश्वसार्हता आणि स्थान कायम ठेवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करता करता मोठी कमालच केलीय, असं म्हणायला हरकत नाही. कंपनीने एक धम्माल स्मार्टफोन सादर केला आहे. 'ब्लॅकबेरी लीप' असं या नवीन स्मार्टफोनचं नाव आहे.

Updated: May 9, 2015, 10:39 PM IST
'ब्लॅकबेरी लीप'... एकाच सीममध्ये वापरा तब्बल नऊ क्रमांक! title=

नवी दिल्ली : स्मार्टफोन उत्पादक कंपनी 'ब्लॅकबेरी'नं आपली विश्वसार्हता आणि स्थान कायम ठेवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करता करता मोठी कमालच केलीय, असं म्हणायला हरकत नाही. कंपनीने एक धम्माल स्मार्टफोन सादर केला आहे. 'ब्लॅकबेरी लीप' असं या नवीन स्मार्टफोनचं नाव आहे.

'ब्लॅकबेरी लीप'चं वैशिष्ट म्हणजे, या स्मार्टफोनमध्ये एकाच वेळी, एकाच सिमच्या साहाय्याने तुम्ही तब्बल नऊ नंबर वापरू शकता. 

एका सिमद्वारे ९ वेगवेगळे  नंबर वापरण्याची सुविधा कंपनीच्या व्हर्च्युअल सिम टेक्नोलॉजीमुळे शक्य झाली आहे. ही सुविधा भारतात सुरू होण्यासाठी कंपनी प्राधिकरण आणि दूरसंचार कंपनीशी चर्चा करत आहे. 

ब्लॅकबेरीच्या या लिप फोनच्या किंमतीचा खुलासा मात्र अद्याप केला गेलेला नाही. या फोनच्या विक्रीला याच वर्षाच्या जून महिन्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे.  

फोनमध्ये ५ इंचाचा डिस्प्ले स्क्रिन आणि १६ जीबी इंटरनल मेमरी उपलब्ध असेल. तसेच ८ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा यात उपलब्ध असेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.