240 रुपयांना अनलिमिटेड इंटरनेटचा 'धडाकेबाज' प्लान!

तुम्ही तुमच्या डाटा कार्डचं बिल भरून भरून वैतागला असाल तर आता तुमचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे. मोबाईलवर इंटरनेटचा वापर धडाधड करणाऱ्यांसाठी बीएसएनएलनं (भारत संचार निगम लिमिटेड) एक धडाकेबाज प्लान सादर केलाय. 

Updated: Apr 2, 2015, 05:17 PM IST
240 रुपयांना अनलिमिटेड इंटरनेटचा 'धडाकेबाज' प्लान! title=

मुंबई : तुम्ही तुमच्या डाटा कार्डचं बिल भरून भरून वैतागला असाल तर आता तुमचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे. मोबाईलवर इंटरनेटचा वापर धडाधड करणाऱ्यांसाठी बीएसएनएलनं (भारत संचार निगम लिमिटेड) एक धडाकेबाज प्लान सादर केलाय. 

1 एप्रिलपासून बीएसएनएलचा अनलिमिटेड डेटा केवळ 240 रुपयांना उपलब्ध झालाय. बीएसएनएलच्या या प्लानमध्ये महिनाभर थ्रीजी इंटरनेट वापरता येण्याची सुविधा आहे. 

या प्लाननुसार, सुरवातीला 1 जीबी इंटरनेट स्पीड 3.6 एमबी प्रति सेकंद असेल. त्यानंतर, मात्र इंटरनेट स्पीड 512 केबी प्रति सेकंद होईल. 

जर तुम्हाला मोठ्या फाईल्स किंवा फिल्म्स डाऊनलोड करायच्या असतील तर तुम्हाला 340 रुपयांचा पॅक अॅक्टिव्हेट करावा लागेल. यामध्ये, सुरुवातीला 2 जीबीपर्यंत 3.6 एमबी प्रति सेकंदनं इंटरनेट काम करेल.

सध्या मोबाईल इंटरनेट ग्राहकांना थ्रीजी इंटरनेट प्लान वापरण्यासाठी जवळपास 300 ते 400 रुपये खर्च करावे लागतात. त्या पार्श्वभूमीवर बीएसएनएलचा हा प्लान युझर्ससाठी फायदेशीर ठरू शकतो.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.